Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुक्ताईनगरात एबी केबल टाकण्याच्या कामांना गती मिळणार

maxresdefault

मुक्ताईनगर प्रतिनिधी । शहरातील तीन प्रभागातील नगरसेवकांच्या पाठपुराव्याने डीपीडीसीएससी योजनेअंतर्गत इलेक्ट्रिक पोलवरील तारा बदलून एबी केबल मंजूर झाली असून लवकरच तिघेही प्रभागात एबी केबलचे टाकण्याचे काम सुरू होणार असल्याची माहिती वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता मनोज चौधरी यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीतर्फे मुक्ताईनगर शहरातून डीपीडीसी योजनेअंतर्गत शहरातील इलेक्ट्रिक पोलवरील ॲल्युमिनियमच्या विद्युत वाहक तारा बदलून एबी केबल मंजुरीसाठी त्या त्या प्रभागातील नगरसेवकांकडून प्रभागात रहिवासी असलेल्या मागासवर्गीय एस सी नागरिकांच्या रहीवासाचे पुरावे म्हणून मतदार यादीतील नावे व जातीचा पुरावा असलेल्या दाखले मागविले होते व याबाबत तसे प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन केले होते . यात प्रभाग क्रमांक 6चे नगरसेवक मुकेश वानखेडे प्रभाग क्रमांक 8 च्या नगरसेविका साधना ससाने तसेच प्रभाग क्रमांक 12 चे नगरसेवक संतोष मराठे या केवळ तीन नगरसेवकांनी प्रतिसाद दिला. प्रभागातील अल्युमिनियमच्या तारा बदलण्यास संदर्भात वीज वितरण कंपनीच्या कागदपत्रांच्या मागणीला वेळोवेळी सहकार्य करीत प्रशासनाकडे पाठपुरावा केला त्यामुळे या तिघही नगरसेवकांच्या वार्डात डीपीडीसी योजनेअंतर्गत इलेक्ट्रिक पोल वरील जुन्या अल्युमिनियमच्या तारा बदलून नवीन एबी केबल टाकण्यात येणार आहे.

यासंदर्भात वीज वितरण कंपनीने नगरपंचायत कडून काम तात्काळ करून घेण्यासंदर्भात वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. यामुळे आता लवकरच प्रभाग क्र 6, 8 व 12 मध्ये एबी केबल ने विजपुरवठा होनार असून या प्रभागात हॉल्टेज कमी जास्त होणे, विजेच्या धक्क्याचे अनुचित प्रकार तसेच विज चोरी अशा प्रकारांना आळा बसेल तसेच ज्यांच्या घराजवळून इलेक्ट्रिक तारा गेल्या आहेत त्यांना तो परिसर सुरक्षित होणार आहे.

Exit mobile version