Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दमानिया व शर्मा यांना न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश

मुक्ताईनगर प्रतिनिधी । Court Issues Warrant सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि प्रीती शर्मा-मेनन यांना येथील न्यायालयाने एकनाथराव खडसे यांच्या बदनामीच्या खटल्यात उपस्थित राहण्याचे निर्देश देत अटक वॉरंट जारी केले आहे.

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची बदनामी केल्याचा आरोप करत रमेश ढोले यांनी मुक्ताईनगर येथील कोर्टात बदनामीचा खटला दाखल केला आहे. यात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि प्रीती शर्मा-मेनन यांनी बदनामी केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे.

या खटल्यात Court Issues Warrant संबंधीत दोन्ही सामाजिक कार्यकर्त्या हजर राहत नसल्याचे दिसून आले आहे. या अनुषंगाने न्यायालयाने सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि प्रीती शर्मा-मेनन यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करून त्यांना १० मे पर्यंत न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. परिणामी आता अटक वॉरंट रद्द करून या दोन्ही सामाजिक कार्यकर्त्यांना मुक्ताईनगर न्यायालयात हजर रहावे लागणार आहे.

Exit mobile version