मुक्ताईनगरच्या विकास आराखड्याला येणार गती : आ. चंद्रकांत पाटलांचा पाठपुरावा

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुक्ताईनगर शहराचा विकास आराखडा तयार करण्यासाठी अनुभवी कंसल्टन्सी नेमणूक करून तिर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत भरीव निधी उपलब्ध करावा अशी मागणी आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली असून याला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

संत मुक्ताई च्या पदस्पर्शाने पावन झालेले संत भूमी तिर्थक्षेत्र मुक्ताईनगर नगरपंचायत हद्यीत असून येथे वारकरी संप्रदायातील संत ज्ञानेश्वरादी चौघे भावंडातील संत मुक्ताबाई या अंतर्धान झाल्याने, त्यांचे मुक्ताईनगर शहराजवळच समाधी स्थळ असुन शहरात नगरपंचायत हद्दीत संत मुक्ताईचे ऐतिहासिक असे मंदिर येथे असल्याने दर पंधरवाडी व महीन्याच्या एकादशीला दर्शनासाठी लाखो भाविक-भक्त तसेच शेकडो पायी दिंडी सोहळे दर्शनासाठी येत असतात. सोबतच या भूमीला ऐतिहासिक वारसा लाभलेला असल्याने दररोज असंख्य पर्यटकांची वर्दळ नेहमी असते. त्यामुळे हा ऐतिहासिक वारसा जोपासण्यासाठी तसेच हे तिर्थक्षेत्र शहरात असल्याने शहराचा विकास होणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी आमदार चंद्रकांत पाटील हे पाठपुरावा करत आहेत.

या अनुषंगाने तिर्थक्षेत्र मुक्ताईनगर शहराचा विकास आराखडा तयार करण्यासाठी अनुभवी कंसल्टन्सीची नेमणूक करून भरीव निधीची तरतूद करण्यात यावी अशा मागणीचे लेखी पत्र आमदार चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दि.१८ मे २०२३ रोजी गुरुवारी दिले असून मुख्यमंत्र्यांनी लागलीच विषेश बाब अ प्रमाणे कार्यवाही करण्याच्या सूचना असलेले रिमार्क मारून मागणी पत्राला हिरवी झेंडी दिली आहे. यामुळे लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे.

Protected Content