Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वयोवृध्दाचा करूण अंत. . .केले असे काही की कुणाचाही होईल थरकाप !

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील ७२ वर्षेे वयाच्या वयोवृध्दाचा अतिशय करूण अंत झाला आहे.

वरणगाव आयुध निर्माण येथून सेवानिवृत्त झालेले लक्ष्मण रामचंद्र धुरंधर यांनी आज आपल्या स्वत:च्या गळ्याला ब्लेड मारून आपली जीवनयात्रा संपविल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे.

ते ऑडनस फॅक्टरी मध्ये कर्मचारी म्हणून कार्यरत होते ते सेवानिवृत्त झाल्यानंतर झाल्यानंतर मुक्ताईनगर येथे राहत होते त्यांनी सकाळी अकराच्या सुमारास त्यांच्या पत्नीला ब्रेड आणण्यासाठी पाठवले. पत्नी बाहेर असतांना त्यांनी स्वतः गळ्याला ब्लेड मारून आत्महत्या केल. लक्ष्मण धुरंधर हे मूळचे वरखेड तालुका मलकापूर येथील रहिवासी आहेत. त्यांना दोन मुले असून एक मुलगा जळगाव व एक मुलगा पुणे येथे नोकरीला आहे. सुमारे १५ वर्षे आधी अपघातात त्यांना आपला पाय गमवावा लागला होता. त्यांच्या मृत्यूने परिसरावर शोककळा पसरली आहे.

Exit mobile version