Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुक्कड चोरटे ! : अंगणवाडीच्या खाऊवरच मारला डल्ला

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील अंगणवाडीतच चोरट्यांनी डल्ला मारत लहान मुलांचा खाऊ चोरून नेला आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, शहरातील अल्फल्हा नगराजवळ असलेल्या इदगाह जवळच्या अंगणवाडी क्रमांक-१८ मध्ये चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. दिनांक ८ रोजी दुपारी एक वाजता अंगणवाडी बंद करण्यात आली. यानंतर काल सकाळी अंगणवाडी पुन्हा उघडली असता यातील काही वस्तू गायब झालेल्या दिसून आल्या. यामध्ये गव्हाची दहा पाकिटे, हरभर्‍याची दहा पाकिटे, तसेच मुगडाळ, साखर आदींची पाकिटे तसेच पातले, प्लेटा आदी चोरट्यांनी लंपास केल्याचे निदर्शनास आले. चोरट्यांनी सुमारे २८५० रूपयांच्या वस्तू चोरून नेल्याचे दिसून आले.

या संदर्भात अंगणवाडी सेविका सुनीता विठ्ठल माळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मुक्ताईनगर पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास विनोद सोनवणे हे करत आहेत.

Exit mobile version