Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मतदान यंत्रात बिघाड; ईव्हीएम बदलून मतदान सुरू !

मुक्ताईनगर पंकज कपले । तालुक्यातील धामणगाव येथील मतदान केंद्रात एका ईव्हीएममध्ये बिघाड झाल्यानंतर प्रशासकीय यंत्रणेने पाच मिनिटात मशिन बदलून पुन्हा मतदान सुरू केले.

धामणगाव (ता. मुक्ताईनगर) येथील मतदान केंद्रावरील एका ईव्हीएममध्ये बीप आवाज येत नसल्याचे सकाळी साडेदहाच्या सुमारास आढळून आले. यामुळे मतदानासाठी आलेल्या ग्रामस्थांनी तक्रार केल्यानंतर प्रशासकीय यंत्रणेने मतदान यंत्र बदलून नवीन मशिनवर मतदान सुरू केले.

दरम्यान, खराब झालेल्या ईव्हीएममध्ये आधी दीडशे मतदान झाले असून त्यातील मोजणी स्वतंत्रपणे करण्यात येणार असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली.

Exit mobile version