Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खा. रक्षाताईंच्या पाठपुराव्याने प्रधानमंत्री आवास योजनेसाठी रु.४.२८ कोटींचा निधी

मुक्ताईनगर Muktainagar प्रतिनिधी । खासदार रक्षाताई खडसे यांच्या पाठपुराव्यामुळे रावेर लोकसभा क्षेत्रासाठी प्रधानमंत्री आवास योजनेसाठी ४ कोटी २८ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

याबाबत वृत्त असे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांशी योजना सर्वांसाठी घरफ अंतर्गत रावेर लोकसभा क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) च्या ई.डब्ल्यु.एस /एल.आय.जी. अंतर्गत गृहनिर्माण व शहरी गरीबी निर्मूलन मंत्रालया मार्फत निधी मंजूर करण्यात आलेला असुन यासाठी खासदार रक्षाताई खडसे यांचा यासाठी वेळोवेळी पाठपुरावा चालू होता.

प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) ई.डब्ल्यु.एस / एल.आय.जी. अंतर्गत बोदवड येथे २०९ घरांसाठी रु.१२२.४० लक्ष, चोपडा येथे १३५ घरांसाठी रु.८१.० लक्ष, मुक्ताईनगर Muktainagar येथे १०२ घरांसाठी ५६.४० लक्ष, वरणगांव येथे १०४ घरांसाठी रु.४९.८० लक्ष व मलकापुर २०० घरांसाठी रु.११९.० लक्ष असा एकूण रु.४२८.६० लक्ष निधी मंजुर करण्यात आल्याची माहिती खासदार रक्षाताई खडसे यांच्या संपर्क कार्यालयाने दिली आहे. या निधीच्या माध्यमातून कोरोना महामारीच्या काळात रखडलेल्या कामांना गती मिळणार असल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे.

Exit mobile version