मुक्ताईनगरात मराठा समाजाचा परिचय मेळावा उत्साहात

मुक्ताईनगर प्रतिनिधी । येथील सकल मराठा समाजाच्या जागेवर सकल मराठा समाज बहुउद्देशीय संस्थेतर्फे परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

या परिचय मेळाव्यास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील, बुलडाणा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उमा तायडे, रावेरचे मुख्याधिकारी जितेंद्र पवार, उद्योजक डी.डी. बच्छाव, राम पवार, जि.प.बांधकाम सभापती रजनी चव्हाण, जि.प.सदस्या रंजना पाटील, जि.प.सदस्य रवींद्र पाटील, बर्‍हाणपूरचे महापौर अनिल भोसले, प्रा.गोपाल दर्जी , डॉ.एन.जी.मराठे व कविता पवार आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर याप्रसंगी पाऊल सहजीवनाचे या परिचय सूचीचे व मराठा समाज दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. मुक्ताईनगर येथे मराठा समाजासाठी जागा मिळवून दिल्याने माजी मंत्री एकनाथ खडसे तर जळगाव शहरात मराठा समाजासाठी एक एकर जागा दिल्याने जिल्हाधिकार्‍यांचे बच्छाव यांनी आभार मानले. मेळाव्याला जिल्हाभरातील मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्यात वधू-वरांनी आपला परिचय करून दिला.

या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी विनोद सोनवणे, निवृत्ती पाटील, डी.बी.पाटील, नगरसेवक डॉ.प्रदीप पाटील, रवींद्र महाजन, जगदीश निकम, दीपक साळुंके, सदाशिव पाटील, विक्की मराठे, ललीत बाविस्कर, शिवराज पाटील, कल्याण पाटील यांनी सहकार्य केले. प्रास्ताविक रमेश ढोले यांनी तर सूत्रसंचालन भाऊराव पाटील यांनी केले.

Add Comment

Protected Content