Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ना. महाजन यांची आ. पाटलांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर जिल्ह्यात आल्यानंतर ना. गिरीश महाजन यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.

ना. गिरीश महाजन आणि आ. चंद्रकांत पाटील यांच्यातील उघड आणि पडद्याआडचे सख्य हे कुणापासून लपून राहिलेले नाही. बोदवड नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारात या दोन्ही मान्यवरांच्या मैत्रीचा मुद्दा खूप गाजला होता. तेव्हा दोन्ही नेते हे एकमेकांशी विरोध असणार्‍या पक्षांमध्ये असल्याने ही मैत्री राजकीय वर्तुळात कुतुहलाचा विषय होती. मात्र राज्यात सत्तांतर झाल्याने हा अडसरही दूर झाला आहे. शिंदे व फडणवीस सरकार सत्तारूढ झाल्यानंतर गिरीश महाजन यांनी चंद्रकांत पाटलांची भेट घेतली होती. यानंतर शनिवारी सायंकाळी ते पुन्हा आमदार पाटलांच्या भेटीला आले.

गिरीशभाऊंनी मंत्रीपदाची शपथ घेतल्याने आमदार पाटील यांच्यातर्फे त्यांचा हृद्य सत्कार करण्यात आला. यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये वार्तालाप झाला. याप्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक कांडेलकर, माजी जि.प. उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख अनिल चौधरी, शासकीय कंत्राटदार तुषार बोरसे आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती.

Exit mobile version