Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शहीद जवानांना मुक्ताईनगर भाजपतर्फे श्रद्धांजली

मुक्ताईनगर प्रतिनिधी । पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना येथील भारतीय जनता पक्षातर्फे श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी माजी महसुल मंत्री आमदार एकनाथराव खडसे, भाजपा तालुका अध्यक्ष दशरथ कांडेलकर, बाजार समिति सभापती निवृत्ती पाटील, भाजप शहराध्यक्ष मनोज तळेले, सरचिटणीस संदिप देशमुख, नगरसेवक ललित महाजन, बापु ससाणे, योगेश कोलते, भाजयुमो विधानसभा क्षेत्र प्रमुख दत्ता पाटील, भा ज यु मो तालुका अध्यक्ष अंकुश चौधरी, युवती प्रमुख आम्रपाली पाटील ,प्रियंका चौधरी ,प्रतिभा ढाके, सुनिल काटे ,प्रफुल जावरे ,सचिन पाटील, पांडुरंग नाफडे, सुभाष खाटीक, संदिप जुमळे, राहुल गोसावी , बापू ठेलारी उपस्थित होते

याप्रसंगी आमदार एकनाथराव खडसे म्हणाले की, भारतीय जवानांवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला.या हल्ल्याचा आपण तिव्र निषेध करतो या हल्ल्यामुळे संपूर्ण भारतवासी शोकसागरात बुडाले आहेत या हल्ल्याची सर्वांच्या मनात प्रचंड चीड आहे. या हल्ल्यात आपल्या शेजारच्या बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील संजय राजपुत आणि लोणार येथिल नितीन राठोड या वीरांचा समावेश आहे या सर्व
जवानांच्या कुटुंबियां सोबत संपूर्ण देश असल्याचे नमूद करत नाथाभाऊंनी शहिदांना आदरांजली व्यक्त केली.

Exit mobile version