Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दुचाकी दुभाजकावर आदळली : तरूण ठार, एक जण जखमी

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांची श्रुंखला कायम असून आज तालुक्यातील पिंप्री अकाराऊत गावाजवळ दुचाकी डिव्हायडरवर आदळून झालेल्या अपघातात एक तरूण ठार झाला असून दुसरा जखमी झाला आहे.

या संदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, तालुक्यातील पिंप्री अकाराऊत गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर एमएच १९ डीएच २०४८ क्रमांकाची दुचाकी महामार्गाच्या दुभाजकावर आदळली. यात दुचाकीस्वार चेतन भिका भवर ( वय २५, रा. पिंप्री अकाराऊत ) हा जागीच ठार झाला. तर वैभव अनिल माळी ( वय २२ हा जखमी ) झाला.

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेतली. वैभव माळी यांना उपचारासाठी उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, चेतन भिका भवर यांच्या मृत्यूमुळे परिसरावर शोककळा पसरली आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

Exit mobile version