Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुक्ताईनगरात लाभार्थी रेशनधान्यापासून वंचित

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील पुरवठा विभागाच्या गलथान कारभारामुळे दसरा व दिवाळी सणांच्या काळात लाभार्थी रेशनच्या धान्यापासून वंचित राहते, या निषेधार्थ आज आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. तसेच २४ तासांत धान्य वाटप न झाल्यास शिवसेना स्टाईलने तहसीलदारांच्या दालनासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

मुक्ताईनगर तालुका पुरवठा विभागाचा अतिशय भोंगळ कारभार सुरू असून शहरातील सहा स्वस्त धान्य दुकानांवर पुरवठा वाहतूक कंत्राटदार व पुरवठा अधिकारी तसेच कर्मचारी यांचे अर्थपूर्ण साठे लुटे असल्याने गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून धान्य पोहोचले नाही त्यातच नवरात्री सारखा मोठा सण आहे.  हिंदू धर्मातील अतिशय महत्त्वाचा सण म्हणजे दसरा येऊन ठेपला आहे. तसेच काही दिवसांनी दिवाळी आहे. परंतु महत्त्वाचे सण असताना देखील अद्याप पर्यंत धान्य दुकानांवर धान्य पुरवठा केला जात नाही. जिल्हाभरात धान्य उपलब्ध असताना पुरवठा विभागातील गलथान कारभारामुळे अन्नसुरक्षा योजनेतील गोरगरीब नागरिक हक्काच्या धान्यापासून वंचित राहत आहे. तसेच सणासुदीच्या काळात नागरिकांना छेडण्याचा हा मोठा प्रकार थांबवण्यात यावा, याकरिता आज निवेदन देऊन आंदोलन ही करण्यात आले. तसेच 24 तासात धान्य वाटप सुरू न केल्यास तहसीलदार कार्यालय येथे मोठ्या स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख छोटूभाई उपतालुकाप्रमुख प्रफुल पाटील, अल्पसंख्यांक जिल्हा संघटक अफसर खान, शहर प्रमुख गणेश टोंगे, राजेंद्र हिवराडे, गोपाळ सोनवणे, संतोष मराठे, संतोष माळी, शकुर जमादार, मुशीर मनियार, शकील मेंबर, साजिद खान, अनिकेत भोई, पिंटू पाटील, अवि अडकमोल यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

Exit mobile version