Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सा. बां. खात्याच्या कर्मचार्‍याला मारहाण : दोघांच्या विरोधात गुन्हा

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सार्वजनीक बांधकाम खात्याचे विश्रामगृह विना पास मिळण्यासाठी सार्वजनीक बांधकाम खात्याच्या कर्मचार्‍याला मारहाण करण्यात आल्याने दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, काल सायंकाळी शासकीय विश्रामगृहात दोन जणांनी धुडगुस घालत कर्मचार्‍याला मारहाण केली. सायंकाळी साडेचार ते पाच वाजेच्या सुमारास योगेश काळे आणि संजय काळे ( पूर्ण नाव माहित नाही ) हे दोन जण आले. त्यांनी उपस्थित कर्मचार्‍याला विना पास विश्रामगृहातील रूम हवी अशी मागणी केली. मात्र असे करता येणार नाही असा पवित्रा संबंधीत कर्मचार्‍याने घेतला. यामुळे या दोन्ही जणांनी त्यांना मारहाण केली.

या संदर्भात, सार्वजनीक बांधकाम खात्याचे सहायक स्थापत्य अधिकारी सचितानंद अशोक शेजवळ ( वय ३८, रा. शासकीय विश्रामगृह, मुक्ताईनगर ) यांनी मुक्ताईनगर पोलीस स्थानकात फिर्याद दिली. यानुसार योगेश काळे आणि संजय काळे ( पूर्ण नाव माहित नाही ) यांच्या विरोधात भादंवि कलम ३३२, ३५३, ५०४ आणि ५०६ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक प्रदीप शेवाळे व विनोद श्रीनाथ हे करत आहेत.

Exit mobile version