Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ब्रेकींग : बसला डंपरची धडक; चालकासह प्रवासी जखमी

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील चिंचखेडा बुद्रुक गावाच्या जवळ भरधाव डंपरने बसला धडक दिल्याने झालेल्या अपघातात १० प्रवासी जखमी झाले आहेत.

या संदर्भात मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, तालुक्यातील चिंचखेडा बुद्रुक गावाच्या पुढे आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास भरधाव डंपरने बसला धडक दिली. यात एमएच१९ सीवाय ५२७२ क्रमांकाच्या डंपने एमएच १३ सीयू ६९३१ क्रमांकाच्या बसला धडक दिली. या अपघातामध्ये १० जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये बसचे चालक नरेंद्र जगन्नाथ देशमुख ( रा. वरणगाव ) तसेच वाहक (कंडक्टर ) प्रितीमा शांताराम अहिरे ( रा. भुसावळ) यांच्यासह सुनील बाबूराव काजनेकर ( उमापूर); बाबूराव दामोदर ठोसर व यमुनाबाई बाबूराव ठोसर ( रा. चिंचखेडा बुद्रुक ); गणेश रामकृष्ण कोळी (रा. पारंबी): इस्माईल खॉ इम्रान खॉ; सुधाकर नारायण अहुळकार ( रा. पारंबी ); निवृत्ती सापुर्डा ढोण; व शुभांगी तुषार अहुळकार यांचा समावेश आहे.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच परिसरातून ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. शिवसेना उप-तालुका प्रमुख नवनीत पाटील, कुर्‍हा शहर प्रमुख पंकज पांडव; युवासेना उपजिल्हा प्रमुख सतीश नागरे, दिलीप भोलाणकर, अविनाश वाढे, ज्ञानेश्‍वर तायडे, शेख अकबर, विष्णू तायडे यांनी जखमीला मदत केली. जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Exit mobile version