Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

श्री.विठ्ठलाच्या चरणी माथा टेकून मुक्ताबाई पालखी माघारी !

पंढरपूर | मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ‘जातो माघारी पंढरीनाथा ! तुझे दर्शन झाले आता’ या भावनेसह दोन वर्षाचे खंडामुळे पांडुरंगाच्या दर्शनासाठी कासावीस झालेल्या भक्तांना घेवून पंढरपुरला गेलेली  मुक्ताईची पालखी आज बुधवारी मुक्ताईनगरला येण्यास निघाली.

पंढरपुरात दर वर्षी विठ्ठलाच्या दर्शनासाठी मुक्ताईनगर येथून मुक्ताईबाईची पालखी जात असते. यंदा देखील आषाढी ए‌कादेशीला जावून विठ्ठलाचे दर्शन घेतले. तसेच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांकडून भगिनी आदिशक्ती मुक्ताबाईस साडीचोळी भेट देण्याचा ऐतिहासिक भावनिक सोहळा शुक्रवारी झाला. तर आज सकाळी गोपाळ पुऱ्यात पालखी सोहळा प्रमुख ह भ प रविंद्र हरणे महाराज यांचे गोपाळकाला व काल्याचे कीर्तन होवून भगवान श्रीविठ्ठल दर्शन घेवून पालखीने निरोप घेऊन दुपारी माघारी मुक्ताईनगरच्या दिशेने निघाली.

आषाढी एकादशीला शेकडो वर्षांची परंपरा जपत मुक्ताईची पालखी कोरोनाचे दोन वर्षाचे खंडामुळे पांडुरंगाच्या दर्शाने कासावीस झालेल्या भक्तांना घेवून  पंढरपुरला गेली होती. बुधवारी गुरु पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर मुक्ताबाई पादुकांना मंत्रोच्चारात पंचामृत अभिषेकपूजा करून साडीचोळी अर्पण संत ज्ञानेश्वरांकडून देण्याचा सोहळा झाला. आज पालखी मुक्ताईनगरला परत येण्याचा सोहळा झाला.

सकाळी सहाला गोपाळपूर येथे ह.भ.प. रवींद्र महाराज हरणे यांनी काल्याचे कीर्तन केले. तसेच भगवान श्रीविठ्ठल दर्शन व निरोप घेऊन दुपारी पालखी माघारी मुक्ताईनगर निघाली. सोमवार  (ता. १ ऑगस्ट २०२२)  पालखी सोहळा मुक्काम दर मुक्काम विसावे घेत नवीन मुक्ताई मंदिर, मुक्ताईनगर येथे पोचेल. यानंतर नवीन मुक्ताई मंदिर ते जुनी कोथळी समाधी स्थळ मंदिर असा मुक्ताईनगर शहरातून भव्य पालखी चा स्वागत सोहळा होणार असून यात वारकरी दिंडी स्पर्धा व टाळ मृदुंगाच्या गजरात अवघे मुक्ताईनगर न्हावून निघणार आहे.

 

पंढरपुरात मुक्ताईचे पालखी गुरूपौणीमेला विठ्ठलाचे सर्व वारकरीचे दशर्न झाल्याचा आनंद सर्व वारकऱ्यांना आहे. मुक्ताईला साडीचोळी देण्याचा सोहळा झाला असून आज मुक्ताईकडे विठ्ठलाचे दर्शन घेवून पालखी निघाली आहे. विठ्ठलाकडे कोरोना जावून , सर्व शेतकऱ्यांना पीक पाणी व सुख समृद्धीची कामांना करून सर्व वारकऱ्यांना पुढील वर्षी परंपरेनुसार पायी दर्शनासाठी येवू देण्याचा साकडे घातले असल्याचे श्री संत मुक्ताबाई संस्थान कोथळी-मुक्ताईनगर अध्यक्ष रवींद्र पाटील यांनी माहिती दिली. यावेळीविश्वस्त शंकरराव पाटील, निळकंठराव पाटील, पंजाबराव पाटील, पालखी सोहळा प्रमुख रविंद्र हरणे महाराज, उद्धव जुनारे महाराज, विजय महराज खवले, नितीन महाराज अहिर , रामभाऊ महाराज झांबरे, लखन महाराज, पंकज महाराज, विशाल महाराज खोले, नरेंद्र नारखेडे, सम्राट पाटील, आदीसह पालखी सोहळ्यातील समस्त भाविक उपस्थित होते.

Exit mobile version