Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जाणून घ्या..मुकेशच्या मारेकऱ्यांचा अटकेचा थरार !

a4352829 d7d4 4d6f ba0e b4dfcbd66748

जळगाव प्रतिनिधी । मु.जे. महाविद्यालयाच्या पार्किंगमध्ये दुचाकीला धक्का लागल्याच्या कारणावरून पाच जणांनी मुकेश सपकाळे नामक तरुणाचा खून केला होता. त्यातील सहा आरोपींपैकी एकास पारोळ्यातून अटक केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली देत इतरांचीही नावे सांगितली होती. त्यानुसार संशयित पाचही आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने मोबाईल लोकेशन आणि पुण्यातील स्थानिक पोलीसांच्या मदतीने सिंहगड परीसरातून ताब्यात घेतले. परंतू या आरोपींच्या अटकेचा थरार मात्र, एखादं सिनेमातील दृश्यासारखाच होता.

 

जाणून घ्या पोलीसांनी कसा केला पाठलाग

शहरातील मूजे महाविद्यालयाच्या पार्किंगच्या आवारात शनिवारी 29 जून रोजी दुपारी १ वाजता याच महाविद्यालयात शिकत असलेला आसोदा येथील विद्यार्थी मुकेश सुधाकर सपकाळे (वय-२२) याच्या छातीत चॉपरने वार करून खून करण्यात आला होता. खून करताच संशयित पसार होत असताना मुकेशचा लहान भाऊ रोहितने पाठलाग करून चॉपर हातात असलेल्या मारेकऱ्याशी झटापट करून पकडले. याच वेळी मारेकऱ्याने रोहितवरही चॉपरने गळ्यावर दोन वेळा वार केला परंतू हे दोनही वार रोहितने चुकविल्याने तो बचावला होता. यानंतर रोहित हा मोठा भाऊ मुकेशच्या दिशेने पळाल्यानंतर पाच ते सहा मारेकरी घटनास्थळाहून पसार झाले होते.

 

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सागर शिंपी यांनी लाईव्ह ट्रेन्डसला दिलेल्या माहितीनुसार, इच्छाराम पुंडलिक वाघोदे (वय २२, रा.समतानगर) यांच्या गाडीला मुकेशचा लहान भाऊ रोहितचा दुचाकी पार्कींग करताना धक्का लागला. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. यावर रोहीतने आपला भाऊ याच महाविद्यालयात शिकत असल्याचे ‘त्याला बोलावतो’ असे सांगितल्यानंतर इच्छारामने देखील किरण अशोक हटकर (वय २०, रा. नेहरु नगर), अरुण बळीराम सोनवणे (वय २३, रा. आंबेडकर चौक, समता नगर), मयूर अशोक माळी (वय १८, रा. जाकीर हुसेन कॉलनी, महाबळ), समीर शरद सोनार (वय १९, रा. फॉरेस्ट कॉलनी, रिंग रोड) व तुषार प्रदीप नारखेडे (वय १९, रा. यशवंत नगर) यांना फोन करून बोलावून घेतले होते. तेवढ्यात मुकेश सपकाळे तेथे आला. आपल्या भावाला मारहाण करत असल्याचे पाहून मुकेशने आवाराआवर करण्याचा प्रयत्न केला. यातील संशयित आरोपी किरण हटकर यांने कमरेतून चॉपर काढून छातीत खुपसला त्यानंतर डोक्यावर वार करत खून केला. यात रोहित सपकाळे आणि किरण हटकर यांच्यात पुन्हा झटापटी झाली. किरणने राहितवर चॉपरचे दोन वार चुकविल्यानंतर सर्वजण शिरसोलीकडे पसार झाले. इकडे मोठ्या भाऊ रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे लक्षात आल्यानंतर त्याला तातडीन खासगी रिक्षाने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता त्याला मृत घोषीत केले.

 

नातेवाईंकांचा आक्रोश

खुन झाला त्यानंतर मारेकऱ्यांमधील इच्छाराम वाघोदे हा पारोळ्याच्या दिशेने गेला तर उर्वरित किरण अशोक हटकर, अरुण बळीराम सोनवणे, मयूर अशोक माळी, समीर शरद सोनार व तुषार प्रदीप नारखेडे हे पाचही जण शिरसोलीकडे पसार झाले. दरम्यान जिल्हा रूग्णालयात मुकेश सपकाळे याला मृत घोषीत केल्यानंतर मुकेशच्या नातेवाईकांनी मारेकरी जोपर्यंत पकडून आणत नाही तो पर्यंत मुकेशचा मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतला होता. यावेळी जिल्हा रूग्णालयात जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, उपविभागीय पोलीस अधिकारी निलाभ रोहन आणि अपर पोलीस अधिक्षक लोहीत मतानी यांच्यासह रामानंद नगर आणि जिल्हा पेठ पोलीसांचे पथक दाखल झाले होते.

 

रोहितने संशयितांना फोटोवरून ओळखले

जिल्हा रूग्णालयातील शवविच्छेदन विभागाजवळ मयत मुकेशचा भाऊ रोहित सपकाळे हा देखील रक्ताने माखलेल्या कपड्यासहीत उपस्थित होता. त्यावेळी पोलीसांनी रोहितकडून घटनाक्रम लक्षात जाणून घेतला आणि रामानंद नगर पोलीस कर्मचारी यांनी काही संशयितांचे फोटो रोहिला दाखविण्यात आले. यात एका फोटोत दोन संशयित आरोपींना रोहितने ओळखले होते. त्याचवेळी जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहम यांना चौकशी करण्याच्या सुचना दिल्यात. स्थानिक गुन्हे शाखेचे तीन पथक तयार करून समता नगर, मोहाडी रोड आणि शिरसोली रोडकडे रवाना झाले. वरील संशयित आरोपींपैकी इच्छाराम वाघोदे यांचा मित्र समता नगरात असल्याची माहिती पोलीसांना मिळाल्यानंतर त्यांना त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले.

 

इच्छारामला पारोळ्यात अटक

एलसीबी पथकाने त्याला चौकशीसाठी घेतल्यानंतर त्याच्याच मोबाईलनंबर वरून इच्छारामला फोन लावला. त्यावेळी मित्राने त्याला कुठे असे सांगितल्यानंतर, इच्छाराम ढसाढसा रडत होता. “आपण केलेल्या कृत्याचा पश्चाताप होत असल्याचे त्याने मित्राला बोलून दाखविले व मी आता पारोळा येथील बसस्थानकात बसलो” असे सांगितले. फक्त एवढी माहिती मिळाल्यानंतर एलसीबी पथकाला पहिला क्ल्यू मिळाला. त्याला घेण्यासाठी एलसीबीचे पोउनि सागर शिंपी पथक जळगावहून रवाना झाले. पारोळ्याला पोहचायला उशीर होणार असल्याने पारोळा येथील डीबी विभागाला कळविल्यानंतर त्यांनी इच्छाराम वाघोदे याला ताब्यात घेतले.

 

अन् इच्छाराम पोपटासारखा बोलू लागला

इच्छाराम वाघोदेची कसून चौकशी केली असता त्याने पटापट पोपटासारखा बोलू लागला. माझ्या गाडीला धक्का लागल्याने मीच मित्रांना बोलावले होत असे त्यांन कबुल केले. त्यानुसार त्याने घटनास्थळी असलेल्या मित्रांची नावे सांगितली. पारोळा पोलीसांनी इच्छारामला स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात दिले. जळगावला उरलेली मित्रांची नावे मिळाल्यानंतर मोबाईल लोकेशन घेण्यासाठी सर्व यंत्रणा गुन्हेगारांच्या शोधासाठी पाचोरा आणि जळगाव कसून शोध सुरू होता. दरम्यान यातील मयूर माळीच्या मोबाईलचा लोकेश शिरसोली पर्यंत दिसून आला. त्यानंतर त्याचा मोबाईल देखील बंद असल्याचे दिसून आले.

 

 

सर्वांचे मोबाईलचे कॉल डिटेलचेक करण्यात आले. प्रत्येक नंबरची कसून चौकशी व माहिती घेण्यात येत होती. दरम्यान एलसीबीला पुढचे लोकेश पुण्याचे आढळून आल्यानंतर एलसीबीचे पोलीस निरीक्षक बापु रोहम यांनी पोलीस उपनिरीक्षक सागर शिंपी यांनी पुण्याकडे जाण्याच सुचना मिळाल्या. पो.उ.नि. सागर शिंपी, विजयसिंग पाटील, पो.हे.कॉ. विनोद पाटील, अनिल देशमुख, किरण धनगर, चालक बारी असे एलसीबी पथक पुण्याकडे 30 जूनच्या मध्यरात्री 1 वाजता रवाना झाले. सकाळी 10 वाजता पुण्यात पोहचल्यानंतर सर्व संशयितांचा एक मित्र कार्तीक चौधरी (रा. रिंगरोड) हा शिकायला पुण्यातील सिंहगड येथे असल्याचे समजले. त्यानुसार त्याच्या मोबाईलचे कॉल डिटेलही चेक करण्यात आले.

 

त्यानुसार कार्तीक ज्या ठिकाणी भाड्याने राहतो त्याचा मोबाईल नंबर मिळविल्यानंतर त्यांनी मालक धनंजय शंकर रागी यांच्याशी संपर्क साधून त्यांना सहाकार्य करण्याचे सांगितले. त्यानुसार पोउनि सागर शिंपी यांनी जळगाव एलसीबीची वाहन सोडून पुण्यातील क्राईम ब्रॅन्चचे वाहने आणि स्थानिक दोन ते तीन कर्मचारी आणि घर मालक धनंजय याला सोबत घेवून त्याच्या प्लॅटवर गेले ज्या‍ठिकाणी कार्तीक राहत होता. पोउनि सागर शिंपी यांनी दोन पथक तयार केले. एक पथक प्लॅटच्या बाजूला आणि एक पथक दरवाजा समोर उभे केले. प्लॅटच्या बाहेर पाच ते सहा जणांचे चपला बाहेर पडलेले दिसून आले. स्थानिक क्राईम ब्रॅन्च पोलीस कर्मचारी यांनी दरवाजा ठोकला. कार्तीकने दरवाजा उघला, पोलीस कर्मचारी आत गेले, त्यांच्या पाठोपाठ पोउनि सागर शिंपी आणि पथक आत शिरले. पोलीसांनी पाहताच सर्व संशयित आरोपी आवक झाले. त्यांना कोणतीही हालचाल करण्यास वाव मिळाला नाही. सायंकाळी 4 वाजता पोलीस पाचही संशयित आरोपींना ताब्यात घेवून 1 जुलै रोजी पहाटे 4 वाजता येवून आरोपी रामानंद नगर पोलीसांना ताब्यात दिले.

Exit mobile version