Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

टी-सीरीजला मागे करत मिस्टर बीस्ट बनला नंबर १ युट्यूब चॅनेल

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | युट्यूबच्या जगतात एका 26 वर्षांच्या मुलाने इतिहास रचला आहे. या मुलाने भारताच्या म्युझिक कंपनीला फॉलोअर्स व सबस्क्रायबर्समध्ये मागे टाकलं आहे. युट्यूबवर सगळ्यात जास्त सब्सक्राइबर्स टी-सीरीजचे होते. मात्र, आज टी-सीरीजला मागे टाकत मिस्टर बीस्टने नवीन रेकॉर्ड रचला आहे. सोशल मीडियावरदेखील या मिस्टर बीस्टने बोलबाला आहे.

युट्यबची सुरुवात 2005 मध्ये झाली होती. या प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतात. यामुळं प्रेक्षकांचे मनोरंजन तर होतेच पण लोक लाखो-कोटी रुपयांपर्यंत कमाईदेखील करतात. युट्युबवर व्हिडिओबरोबरच आता लोक शोर्ट्स म्हणजेच शॉर्ट व्हिडिओदेखील अपलोड करत आहेत. मात्र, आता सब्सक्राइबर्सच्या शर्यतीत मिस्टर बीस्टने पहिला नंबर पटकावला आहे.

मिस्टर बीस्ट हे एक युट्यूब चॅनल आहे आणि ज्याचे हे युट्यूब चॅनेल आहे त्याचे वय फक्त 26 वर्षे असून त्याचे नाव जिम्मी डोनाल्डसन आहे. युट्यूबवर नंबर 1चा क्रमांक पटकावल्यानंतर डोनाल्डसन खूप जास्त आनंदी आहे. त्याने त्याच्या एक्स अकाउंटवर स्वतःच ही गुड न्यूज शेअर केली आहे. त्याने त्याच्या पोस्टमध्ये टी-सीरीज आणि मिस्टर बीस्ट दोघांच्या युट्यूब सब्सक्राइबर्स कंपेअर केले आहेत. ज्यात तुम्ही पाहू शकता की, मिस्टर बीस्टचे फॉलोवर्स टी-सीरीजच्या तुलनेत जास्त आहेत. एक्सवर डोनाल्डसनने लिहले आहे की, 6 वर्षांनंतर अखेर आम्ही प्युडीपायचा बदला घेतलाच.

Exit mobile version