Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई; दोन वेळा होता हद्दपार

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रामानंदनगर पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या दाखल गंभीर गुन्ह्यातील गुन्हेगाराला एमपीडीए कायद्यांर्गत एक वर्षासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक एम राजकुमार यांनी स्थानबद्ध करण्याचे आदेश काढले आहे. विशाल भिका कोळी (वय-२४) रा. कोळीवाडा पिंप्राळा, जळगाव असे स्थानबद्ध केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.

रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगार विशाल कोळी यांच्या विरोधात दरोडा टाकणे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न,  जबर दुखापत, बेकायदेशीर मंडळी जमा करून अटकाव करणे, गावठी हातभट्टीची दारू विक्री करणे, सट्टा जुगार खेळणे असे वेगवेगळे एकूण ११ गंभीर गुन्हे दाखल आहे. त्याला यापूर्वी दोन वेळा हद्दपार करण्यात येऊन देखील त्याने हद्दपारचे आदेश उल्लंघन केले. त्यामुळे रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी गुन्हेगार विशाल कोळी याच्याविरोधात अहवाल तयार करून जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्याकडे पाठवला. त्यानुसार एम राजकुमार यांनी तो अहवालाचे अवलोकन करून अट्टल गुन्हेगार विशाल भिका कोळी याला एमपीडीए कायद्यांतर्गत १ वर्षासाठी नागपूर येथील मध्यवर्ती कारागृह येथे स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहे.

आदेशानुसार रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ संजय सपकाळे, सुशील चौधरी, सुनील दामोदरे, पोलीस नाईक राजेश चव्हाण, पोहेकॉ विजय खैरे, पोलीस नाईक रेवानंद साळुंखे, रवींद्र चौधरी, उमेश पवार, जुलाल सिंग परदेशी, किरण पाटील यांनी संशयित आरोपीला स्थानबद्ध केले आहे.

Exit mobile version