Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सुप्रिम कॉलनीतील गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी काढले आदेश

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एमआयडीसी पोलीस ठाण्यात हातभट्टीची बेकायदेशीर दारू विक्रीसह वेगवेगळ्या स्वरूपाचे १४ गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारावर एमपीडीए अंतर्गत स्थानबध्दतेची कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी काढले आहे अशी माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी शुक्रवारी २२ सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे. आझाद बहादुर भाट (वय-४१) रा. रामदेवबाब मंदीराजवळ, सुप्रिम कॉलनी असे स्थानबध्द केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.

एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीर गावठी हातभट्टीची दारू तयार करून विक्री करणारा  आझाद बहादुर भाट यांच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या स्वरूपाचे १४ गुन्हे दाखल आहे. असे असतांना देखील त्याच्यात कोणतीही सुधारणा होत नव्हती. या अनुषंगाने एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्याबाबतचा अहवाला जिल्हा पोलीस अधिक्षक एम.राजकुमार यांच्याकडे सादर केला होता. त्यानुसार पोलीस अधिक्षकांन अहवालाचे अवलोकन करून प्रस्तावाला मंजूरी मिळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला. त्यानुसार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रस्तावाला मंजूरी देवून गुन्हेगार  आझाद बहादुर भाट याला नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द केले आहे. अशी माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी शुक्रवारी २२ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

 

ही कारवाई पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिपक जगदाळे, रविंद्र गिरासे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पो.ना. सचिन पाटील, योगेश बारी, इम्रान सैय्यद, सुधिर साळवे, पो.कॉ विशाल कोळी, राहूल रगडे, महिला पो.कॉ. हसीना तडवी, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार युनूस शेख इब्राहिम, पोहेकॉ सुनिल दामोदरे, जयंत चौधरी आणि पंडीत पाटील यांनी कारवाई केली आहे.

 

Exit mobile version