Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वडाळा वडाळी रेल्वे अंडरपासबाबत खा. उन्मेष पाटील आक्रमक

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील वडाळा वडाळी रेल्वे अंडरपासमुळे ग्रामस्थांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी खासदार उन्मेष पाटील यांनी पुढाकार घेतला आहे.

वडाळे वडाळी ता चाळीसगाव येथील मध्यरेल्वेच्या खंबा क्र ३४०/२४ जवळ भुयारी मार्गाचे काम गेल्या वर्षंभर पासून सुरू आहे. वडाळे ते हिंगोणे मार्गावर वाहतुकीसाठी पारंपरिक चालत असलेला रस्ता बंद करून बोगद्याच्या काम रेल्वे प्रशासनाकडून सुरु आहे. मात्र यामुळे वडाळे गावात येणार्‍या जाणार्‍या मोठया वाहनांना दळणवळणचा मार्ग अडचणीचा होणार असल्याने ग्रामस्थांनी खासदार उन्मेशदादांना साकडे घातले होते. या अनुषंगाने आज खासदार उन्मेशदादा पाटील यांनी रेल्वेच्या वरीष्ठ अधिकार्‍यांना प्रत्यक्ष कार्यस्थळावर जावून जनतेच्या अडचणी समजावून मार्ग काढण्याचे निर्देश दिले होते.

या अनुषंगाने, रेल्वेचे अधिकारी एडीईएन पि.डी.वाडेकर , रेल्वे अभियंता राहुल पाटील यांनी वडाळावडाळी येथे भेट दिली. याप्रसंगी ग्रामस्थांशी चर्चा केल्यानंतर जोवर या प्रकरणी मार्ग निघत नाही, तोवर या अंडरपासचे काम बंद राहील असा निर्णय घेण्यात आला. यामुळे परिसरातील ग्रामस्थांची गैरसोय दूर होणार आहे.

यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा डी.आर.यु.सी. मेंबर के बी साळुंखे, दरेगावचे माजी सरपंच भैय्यासाहेब पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती संजय पाटील, माजी सभापती दिनेश बोरसे,धर्माआप्पा अहिरराव यांच्यासह गावकरी अशोक आमले, निलेश अहिरराव ,संजय आमले, विकास आमले, बापू आमले, सुशील आमले, किशोर शेवरे, शांताराम अहिरराव, काशिनाथ सूर्यवंशी, समाधान आमले, रितेश आमले, पोपट अहिरराव, रघुनाथ आमले, रवींद्र सूर्यवंशी ,सुरेश आमले, भारत आमले, सुनील अहिरराव, राजेंद्र आमले, भूपेंद्र अहिरराव, मुकेश कासार, पत्रकार भोजराज आमले इ. सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version