खा. उन्मेष पाटील यांनी घेतली रेल्वेमंत्री गोयल यांची भेट

जळगाव प्रतिनिधी । खासदार उन्मेष पाटील यांनी दिल्लीत रेल्वे मंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन मतदारसंघातील विविध कामे पूर्ण करण्याबाबत चर्चा केली.

जळगावचे खासदार उन्मेष पाटील MP Unmesh Patil यांनी दिल्ली येथे रेल्वे मंत्री पीयूष गोयल Railway minister Piyush Goyal यांची भेट घेतली. रेल्वे मंत्री गोयल आणि खासदार पाटील यांच्यामध्ये सुमारे अर्धा तास वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली. या मागण्यांबाबत सकारात्मक मार्ग काढण्याचे आश्‍वासन मिळाले.

या भेटीत त्यांनी धरणगाव येथील बाजार समितीजवळ तात्पुरते रेल्वे गेट बसवले आहे. परंतु रेल्वे उड्डाणपूल झाल्याने हे रेल्वे गेट पूर्णपणे बंद करण्यात आले. यामुळे मोठी गैरसोय होते. बाजार समितीजवळ रेल्वे आरयूबी तयार करुन पर्यायी मार्ग द्यावा, अशी मागणी केली.

दरम्यान, अमळनेर रेल्वे स्टेशनवरील दोन्ही प्लॅटफॉर्म परस्परांना समांतर नाहीत. ते मागे-पुढे तयार केले आहेत. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होते. त्यांची लांबी एकसमान करावी, अशी मागणी केली. चांदणी कुर्‍हे (ता.अमळनेर) या रेल्वे मार्गाजवळील सतीमाय मंदिर हे परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या मंदिराजवळून शंभर मीटर अंतरावर टाकरखेडा अंडरपास आहे. तेथून या मंदिरावर जाण्यासाठी मार्ग मोकळा करणे,

तर, चाळीसगाव तालुक्यातील हिरापूर रेल्वे स्टेशनजवळील ब्रिटिशकालीन अंडरपास सद्य:स्थितीत रस्त्याची उंची वाढल्याने खोलगट झाला आहे. परिणामी तेथे नेहमी पाणी साचून राहते. परिसरातील १० ते १२ गावे या अंडरपासचा वापर करतात. त्यामुळे हिरापूर अंडरपासची समस्या तातडीने सोडवावी, अशी मागणी देखील खासदार उन्मेष पाटील यांनी केली.

Protected Content