Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बलून बंधार्‍यांसाठी खा. उन्मेष पाटील यांचे निती आयोगाला साकडे

जळगाव प्रतिनिधी । गिरणा नदीवरील नियोजीत सात बलुन बंधारे लवकर मार्गी लागावेत यासाठी आज खासदार उन्मेषदादा पाटील यांनी निती आयोगाच्या सल्लागार अविनाश मिश्रा यांची दिल्लीत भेट घेतली. याप्रसंगी झालेल्या चर्चेत त्यांनी बलून बंधार्‍यांसाठी त्यांना साकडे घातले.

आज खासदार उन्मेषदादा पाटील यांनी निती आयोगाच्या सल्लागार अविनाश मिश्रा यांची दिल्लीत भेट घेतली. यावेळी सुमारे अर्धा तास या विषयांवर उभयतांमध्ये चर्चा होवून या प्रकल्प लवकर मार्गी लागावा. भूसंपादनाची गरज नसल्याने याची तातडीने स्थळ निश्‍चिती होवून या अहवाल पंतप्रधान कार्यालयाकडे पाठविण्यात बाबत यावा अशी मागणी खासदार उन्मेषदादा पाटील यांनी निती आयोगा कडे केली. याबाबत सकारात्मक चर्चा होवून येत्या महिन्यात विशेष बाब म्हणून हा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागणार असल्याने एकशे दहा किलोमीटर लांबीचे गीरणा खोरे समृद्ध होणार असल्याची माहिती खासदार उन्मेश दादा पाटील यांनी आज नवी दिल्ली येथून बोलतांना दिली आहे.

आयोग सकारात्मक

खासदार उन्मेश दादा पाटील नुकतीच केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेद्रसिंग शेखावत यांची भेट घेऊन गिरणा नदीवरील सात बलून बंधाऱ्यासंदर्भात लवकरच जलशक्ती मंत्रालयाचे अधिकारी व निती आयोगाची बैठक घ्यावी अशी मागणी केली होती. त्या अनुषंगाने आज नवी दिल्ली येथे निती आयोगाच्या सल्लागार समितीचे सल्लागार अविनाश मिश्रा यांची भेट घेऊन चर्चा केली.

निती आयोगाच्या माध्यमातून प्रकल्प लवकर मार्गी

चाळीसगाव, पाचोरा, भडगाव यासह अर्धा जिल्हा सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठी संजीवनी ठरणार असलेल्या प्रस्तावित सात बलून बंधाऱ्यांच्या मंजुरीसाठी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी जलशक्ति मंत्री ना. गजेंद्र शेखावत,जलशक्ति मंत्रालयाचे प्रधान सचिव यू पी सिंग तसेच जल आयोगाचे अध्यक्ष आर के जैन यांच्याकडे सर्व पातळीवर पाठपुरावा करून अंतिम टप्प्यात असलेल्या प्रकल्पाला निती आयोगाच्या माध्यमातून प्रकल्प लवकर मार्गी लागावा यासाठी भक्कम पाठपुरावा सुरू ठेवला आहे. गेल्या अडीच वर्षाच्या मेहनतीला फळ मिळणार असून तत्कालीन जळशक्ती मंत्री नितीन गडकरी, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,माजी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या सात बलून बंधारे प्रस्तावास केंद्रीय जल आयोगाचा हिरवा कंदील मिळाला होता देशातील महत्वाकांक्षी पहिला उबेर मेअर गेट अर्थात रबर युक्त बलून बंधारे प्रत्यक्षात साकारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी लवकरात लवकर जागा निश्चिती होवून हा प्रकल्प मार्गी लागावा.यासाठी निती आयोगाची पुढील भूमिका महत्वाची असल्याने आज खासदार उन्मेश दादा पाटील यांनी निती आयोगाचे सल्लागार अविनाश मिश्रा यांची भेट घेऊन चर्चा केली.

बंधारे पूर्ण करणेसाठी खासदारांनी कंबर कसली

या बंधाऱ्यामुळे खान्देश मध्ये जलक्रांती होईल.तसेच हा सर्व परिसर सुजलाम सुफलाम होण्यास मदत होईल. कोणत्याही परिस्थितीत देशातील पथदर्शी व राज्यातील एकमेव असलेला हा सात बलून बंधारे प्रकल्प मंजूर झाल्याने हा प्रकल्प पूर्ण करून गिरणा खोरे समृद्ध करणार असल्याची ग्वाही खासदार उन्मेश दादा पाटील यांनी दिल्ली येथून बोलतांना व्यक्त केली आहे.

देशात पथदर्शी सात बलून बंधारे

मेहूणबारे, बहाळ ( वाडे), पांढरद, भडगाव, परधाडे, माहिजी, कानळदा या ठिकाणी हे बंधारे प्रस्तावित असून यामध्ये साचणारे पाणी : 25.28 दशलक्ष घनमीटर इतक्या क्षमतेने साचणार असून यासाठी सुमारे
अपेक्षित खर्च 781कोटी,32लाख येणार आहे. हा खर्च नीती आयोगाच्या डिमांड 48 या शिर्षकाअंतर्गत तरतुदी मुळे निधी मिळणार आहे या बंधाऱ्यामुळे एकूण
6471 हेक्‍टर क्षेत्राला लाभ होणार आहे. जिल्ह्यातून वाहणाऱ्या गिरणा नदीतील पाणी बंधारे नसल्याने वाहून जाते. त्यामुळे गिरणा धरणापासून पुढील बाजूस असलेल्या नदीवर सात बलून बंधारे बांधून पाणी अडविण्याचा प्रस्ताव पाटबंधारे विभागासमोर खासदार उन्मेश पाटील आमदार असताना यापूर्वीच ठेवण्यात आलेला होता यामुळे नदीतून वाहून जाणारे पाणी अडविण्यास मदत होणार आहे.

देशातील “माईलस्टोन” प्रकल्प

जिल्ह्यातून वाहणाऱ्या गिरणा नदीचे पाणी थेट तापी नदीत मिळते. धरणापासून तापी पर्यंत नदीच्या वाटेत कोठेही पाणी अडवले जात नसल्याने पावसाचे पाणी वाहून जाते. त्यामुळे जिल्ह्यातून वाहणाऱ्या गिरणा नदीचे पाणी अडवले जाऊन त्याचा सिंचनासाठी लाभ व्हावा यासाठी खासदार उन्मेश दादा पाटील या विषयाला प्राधान्य देत भक्कम पाठपुरावा सुरूच ठेवला होता. आमदार असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनातून राज्यपालांकडून या प्रकल्पासाठी विशेष बाब म्हणून मंजुरी खासदार उन्मेश पाटील यांनी मिळविली होती. जिल्ह्यातील मेहुणबारे, बहाळ, परधाडे यासह इतर सात ठिकाणांची पाहणी करून जलआराखडा नसल्याची त्रुटी ते केंद्रीय जलआयोगाच्या वडोदरा कार्यालयाच्या परवानगी पर्यंत चा सर्व पाठपुरावा रात्रंदिवस सुरू ठेवला.या भागातील नदी पात्रात बंधारे बांधण्याचा प्रस्ताव पाटबंधारे खात्याने यापूर्वीच वरिष्ठांकडे पाठविण्यात आला होता. याबाबत पाणी उपलब्धता प्रमाणपत्र यापूर्वी उपलब्ध झाले होते. बधांऱ्यांच्या जागेसाठी सर्वेक्षण होऊन जागा निश्चिती देखील झाल्या होत्या. यासाठी बांधकामाचे प्रस्ताव तयार करण्यात येऊन त्यास प्रशासकीय मान्यता घेण्यात आलेली होती. खऱ्या अर्थाने गिरणा खोऱ्यात जलक्रांती साकारली जाणार असून निती आयोगाच्या माध्यमातून लवकरच हा प्रस्ताव माननीय पंतप्रधान कार्यालयाकडे पाठविण्यात येणार असल्याचा विश्वास निती आयोगाचे सल्लागार अविनाश मिश्रा यांनी दिल्याने गिरणा खोरे समृध्द करण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची भावना खासदार उन्मेश दादा पाटील यांनी दिल्ली येथून बोलतांना व्यक्त केले आहे.

Exit mobile version