खा. नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं ‘हे’ ओपन चॅलेंज !

मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । खासदार नवनीत राणा यांना आज लिलावती हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. हॉस्पिटलच्या बाहेर समर्थकांकडून राणा दाम्पत्याला हनुमानाची मुर्ती भेट देण्यात आली. नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना ओपन चॅलेंज दिले आहे.

 

नवनीत राणा माध्यमांशी बोलतांना सांगितले की, “मी अशी कोणती चूक केली? प्रभू श्रीरामाचं नाव घेणं, हनुमंताचं नाव घेणं चूक असेल, तर १४ दिवस काय? मी १४ वर्ष शिक्षा भोगायला तयार आहे. मला जेलमध्ये टाकलं तरी माझा आवाज तुम्ही दाबू शकत नाही.”, असं त्या म्हणाल्या. महाविकास आघाडीत सत्तेचा गैरवापर होत असल्याची तक्रार पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांकडे दिल्लीत करणार असल्याचं नवनीत राणा यांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना त्यांनी थेट आव्हान दिलंय. महाराष्ट्रातील कोणत्याही मतदार संघात निवडणूक लढवावी, मी त्यांच्या विरोधात निवडणूक लढीन, असं राणा म्हणाल्या आहेत. एवढंच नाहीतर मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात शिवसेनेच्या विरोधात प्रचार करणार असल्याचं नवनीत राणा यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना आज लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. गुरुवारपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठणासाठी राणा दाम्पत्य मुंबईत धडकलं आणि त्यानंतर झालेल्या नाट्यानंतर नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांना अटक करण्यात आली. १२ दिवस तुरुंगात काढल्यानंतर नवनीत राणा यांची गुरुवारी जामिनावर सुटका झाली आणि त्याच दिवशी त्या रुग्णालयात दाखल झाल्या. कारागृहात योग्य वागणूक न मिळाल्याने प्रकृती बिघडल्याचा आरोप नवनीत राणांनी केला आहे. आज डिस्चार्ज मिळाल्यानंतर पुन्हा एकदा नवनीत राणा यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे.

Protected Content