सोमवारी वीज कर्मचाऱ्यांचे फ्रंट लाईन वर्कर म्हणून घोषित करण्यासाठी आंदोलन

जळगाव, प्रतिनिधी । वीज कंपन्यातील कामगार व अभिंयते याना फ्रंट लाईन वर्कर घोषित करुन त्यानुसार सोयीसुविधा  दया या मागणीसाठी वीज कामगार,अभिंयते व अधिकारी  हे सोमवार १७ मे रोजी राज्यभर निदर्शने आंदोलन करणार आहेत.

महावितरण, महानिर्मिती व महापारेषण कंपन्यातील कामगार,अभिंयते व अधिकारी तसेच कंञाटी,आऊट-सोर्सिग कामगार व सुरक्षा-रक्षक कर्मचाऱ्यांना फ्रंन्टलाइन वर्कर म्हणून जाहिर करण्याचा प्रस्ताव तिन्ही कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यानी ऊर्जा विभागास पाठविला आहे. हा प्रस्ताव  ऊर्जा विभागाने पाठविलेला प्रस्ताव आरोग्य विभागाने  मुख्यमंत्री यांची मान्यता घेवुन फ्रंटलाईन वर्कर घोषीत करण्याची प्रक्रिया करणे गरजेचे असतांना तसे झालेले नाही.  गेल्या मार्चपासुन तिन्ही कंपन्यातील चारशेच्यावर कामगार मुत्यु पावले असून  हजारो कामगार बांधित झालेले असून ते  विविध हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे.  कामगारांच्या मेडिक्लेम पॉलीसीची मुदत  १४ मे  २०२१ रोजी संपत असून यास मदतवाढ देण्याची फाईल ऊर्जामंत्र्यांच्या सहीसाठी पडून आहे.  महावितरण कंपनीचे अध्यक्ष व कामगार सघंटना पदाधिकारी यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांना पञ लिहुन वीज कामगार यांना प्रथम लस उपलब्ध देण्याची मागणी केलेली आहे.  ती काही जिल्ह्यात मान्य करुन लस उपलब्ध करुन देण्यात येत आहे. माञ अनेक जिल्हात आजही लस देण्यात येत नाही. वीज कामगार व अभिंयते याना सर्व सोयी उपलब्ध करुन दयावे या एकमेव मागण्यासाठी राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी व सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी सोमवार  १७ मे रोजी राज्यभर आंदोलन पुकारले असल्याचे अध्यक्ष कॉ.मोहन शर्मा,  कार्याधक्ष कॉ. सी. एन.देशमुख,  सरचिटणिस कॉ.  कृष्णा भोयर, कॉ. महेश जोतराव आदींनी कळविले  आहे.

 

Protected Content