Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अमळनेरात महागाई विरोधात आंदोलन

अमळनेर प्रतिनिधी । कोरोना महामारीच्या काळात महागाई वाढल्याचा निषेधार्थ केंद्रसरकारचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीतर्फे जि.प.सदस्या जयश्री पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले असून यासंदर्भातील तहसिलदार मिलिंदकुमार वाघ यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, गॅस,पेट्रोल,सिलेंडर चे दर महिन्यागणिक नवनवीन उच्चांक गाठत आहे. भाजपा सरकार केंद्रात आल्यापासुन ते आजतागायत सामान्य माणसावर फक्त अन्यायच करत आली आहे. तेलाचे भाव असो की दाळीचे भाव असो फक्त वाढ कशी होईल हेच केंद्र सरकार पहात आहे. आणि आता त्यात दिवसेंदिवस भर म्हणुन सिलेंडरचे भाव २५रु.वाढवले आहेत.आधीच कोरोना महामारीच्या काळात लॉकडॉऊन मुळे सामान्य जनतेचे कंबरडे मोडले असून सर्वसामान्यांना रोजगार गमवावा लागल्या आहे,व्यवसाय ठप्प झाले आहेत,दररोज होणारी भाववाढ ही सामान्य जनतेला परवडणारी नाही.

भाववाढ कमी करून सामान्य जनतेला दिलासा मिळावा यासाठी निवेदनाद्वारे केंद्र सरकारला आवाहन करण्यात आले असून महागाई कमी न झाल्यास यापुढे उग्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

यावेळी महिला तालुकाध्यक्ष मंदाकिनी पाटील, शहराध्यक्षा अलका पवार,ग्रंथालय विभागाच्या रिता बाविस्कर, प्रदेश सरचिटणीस रंजना देशमुख,जिल्हा सरचिटणीस योजना पाटील, जिल्हा सचिव आशा चावरिया, तालुका पदाधिकारी आशा शिंदे, भारती शिंदे, वैशाली ससाणे, जलशालीनी महाजन उपस्थित होते. तसेच रा.कॉ.शहराध्यक्ष मुख्तार खाटीक, बाळु पाटील, संजय पाटील, रणजित नाना, सुनिल शिंपी, राहुल गौत्राळ, गुणवंत पाटील, गोविंद बाविस्कर, प्रकाश महाजन तसेच इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version