Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महात्मा गांधी उद्यानासमोरून मोटारसायकलची चोरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील महात्मा गांधी उद्यानाजवळून एका तरूणाची ३० हजार रूपये किंमतीची मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, दिपक गुलाब चौधरी (वय-३१) रा. ज्ञानदेव नगर जळगाव हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतो. दरम्यान, २९ मे रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास मोटारसायकल (एमएच १९ डीएल ९०६६) ने जळगाव शहरातील महात्मा गांधी उद्यानासमोर आला. उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत ३० हजार रूपये किंमती मोटारसायकल पार्कींग करून लावली. रात्री ९ वाजता दिपक चौधरी हा काम आटोपून मोटारसायकलजवळ आला असता त्याला दुचाकी जागेवर आढळून आली नाही. त्याने परिसरात मोटारसायकलचा शोधाशोध केली परंतू कुठेही आढळून आली नाही. सोमवारी ३० मे रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक जुबेर तडवी करीत आहे.

Exit mobile version