Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

श्री संत संताजी महाराज पुण्यतिथीनिमित्त मोटरसायकल रॅली

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | श्री संत संताजी महाराज पुण्यतिथीनिमित्त पारोळ्यात मोटरसायकल रॅली चे आयोजन करण्यात आले होते. तेली समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी श्री संताजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने जुना तेली भवन हत्ती गल्ली येथे ब्रह्म मुहूर्तावर संताजी महाराजांचे अभिषेक पूजा करण्यात आली.

सकाळी १० वाजेला जुने तेली भवन येथून मोटरसायकल रॅली काढण्यात आली व आझाद चौक या ठिकाणी श्री संताजी जगन्नाडे महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले व पारोळा तेली समाजाचे अध्यक्ष कैलास चौधरी व सर्व पंचमंडळ व तेली समाज नवयुवक मंडळ व पदाधिकारी यांच्या हस्ते आरती करण्यात आली.

यावेळी उपस्थित तालुक्यातील सर्व समाज बांधव उपस्थित होते आझाद चौक यातून रॅली मार्गस्थ झाली आझाद चौक भवानी चौक व श्रीराम चौक गोहाडी चौक नगरपालिका महाराणा प्रताप चौक व शिवतीर्थ कजगाव नाका ते आझाद चौक ते धरणगाव चौफुली व नवीन तेली भवन येथे संपन्न झाली

Exit mobile version