छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त बुलढाण्यात मोटारसायकल रॅली

बुलढाणा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । जिल्ह्यात मराठा पाटील युवक समितीतर्फे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली.

छत्रपती संभाजी राजे यांची जयंती संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहात साजरी होत असताना जिजाऊचे माहेर घर बुलडाणा जिल्ह्यात देखील मराठा पाटिल युवक समितिच्या वतीने संभाजी राजे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आलीय.

खामगाव येथे सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हारार्पन करुण मोटारसायकल रॅलीला सुरुवात करण्यात आली. युवकानी काढ़लेले मोटर सायकिल रॅली संपूर्ण शहरामधुन परिक्रमा करुण छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा जयघोष करत शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना वंदन करत मराठा पाटील सभागृह जवळ रॅलीचे समारोप करण्यात आला.

यावेळी जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनेचे हजारो कार्यकर्ते आणि युवक रॅलीमध्ये मोठ्या संखेने सहभागी झाले होते तर छत्रपती संभाजी महाराजच्या  जयघोषाणे रजतनगरी दुमदुमुली होती. जयंती उत्साहाने सम्पूर्ण शहर ही भगवामय झालेले होत. रॅली नंतर समाजामध्ये उल्लेखनीय कार्य करणारे अँड प्रदिप पाटील व डॉ. ज्ञानेश्वर नेमाडे यांना छत्रपती संभाजी महाराज समाज गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

 

Protected Content