Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पारोळा येथे संताजी महाराज पुण्यतिथीनिमित्त मोटारसायकल रॅली

पारोळा प्रतिनिधी । संताजी महाराज पुण्यतिथीनिमित्त सालाबादप्रमाणे जुने तेली भवन हत्ती गल्ली येथून समाज पंच मंडळ व नवयुवक तेली समाज मंडळातर्फे मोटार सायकल रॅली काढण्यात आली.

जुना तेली भवन हत्ती गल्ली आझाद चौक जय भवानी चौक, श्रीराम मंदिर चौक, कासार गल्ली रथ चौक ते आझाद चौक दिल्ली दरवाजा ते नव तेली भवन येथे संताजी महाराजांचे प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. दरम्यान, मोटर सायकल रॅलीचे आयोजन तेली समाज पंच मंडळ व नवयुवक तेली समाज मंडळ यांनी आयोजित केलेले होते. यावेळी तालुक्यातील तेली समाज बांधव उपस्थित होते.

 

 

Exit mobile version