Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पंतप्रधान मोदी यांच्या स्वागतासाठी उद्या शहरात मोटर सायकल रॅली

prime minister narendra modi in mandsaur 3ad53cac f059 11e8 86fe bb1c4000c468

जळगाव, प्रतिनिधी | महायुतीचे अधिकृत उमेदवार सुरेश भोळे यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा उद्या रविवार १३ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. यावेळी शहरातून रविवारी ललित कोल्हे यांच्या नेतृत्वात मोटर सायकल रॅली काढण्यात येणार आहे.

पंतप्रधान मोदी यांची जाहीर सभा रविवार १३ ऑक्टोबर रोजी भारत फोर्ज, जळगाव विमान तळा समोर,अजिंठा रोड,कुसंबा येथे होणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या सभेसाठी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री ना. गिरीष महाजन यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. याच पार्श्वभूमीवर उद्या सकाळी  ९ ते ११ यादरम्यान भव्य दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीचे नेतृत्व मनपाचे सभागृह नेते ललित कोल्हे हे करणार आहे. रॅलीचा मार्ग पुढीलप्रमाणे आहे.  प्रभात चौक ( एल.के.फाऊंडेशनचे कार्यालय ) येथून सुरवात – स्वातंत्र्य चौक- स्टेडीयम- कोर्ट चौक- नेहरु चौक- टाँवर चौक- घाणेकर चौक- शनिपेठ चौक- रथ चौक- पांझरापोळ- नेरी नाका- अजिंठा चौफुली- रेमंड चौक- नंतर विमानतळावर सभास्थळी रँलीचा समारोप होईल. तरीसुद्धा सर्व नागरिकांनी  मोठ्या संख्येने सकाळी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version