Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मांडवेदिगर येथे उद्यापासून मोतीमाता देवीचा यात्रोत्सव

motimata devi

 

जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील गारखेडा येथुन जवळच असलेल्या मांडवेदिगर येथे बंजारा समाजाची कुलस्वामिनी मोतीमाता देवीचे जागृत देवस्थान आहे. मोतीमाता देवी यात्रोत्सव सालाबादप्रमाणे यंदाही मोतीमाता मंदिर ट्रस्ट, मांडवेदिगर तर्फे साजरी करण्यात येणार आहे. या उत्सवाचे उद्यापासून शाकंभरी पौष पौर्णिमा (दि.१०) ते (दि.११) जानेवारीपर्यंत आयोजन करण्यात आले आहे.

या यात्रोत्सवात संपूर्ण खान्देश व राज्यातील बंजारा समाज व अन्य समाजबांधव मोठ्या संख्येने सामील होत असतात. या यात्रोत्सवाला जय सेवालाल बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी-अधिकारी संघटनेचे मुंबई अध्यक्ष अशोक चव्हाण, पोलीस पाटील, रविंद्र पवार, तंटामुक्ती अध्यक्ष, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सर्व सन्माननीय सदस्य, तसेच युवक मंडळ, सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक पोलीस प्रशासन यांचे सहकार्य लाभले आहे.

देवस्थान परिसरामध्ये सर्व व्यापारी, मिठाई दुकानदार, भांडी, खेळणी दुकानदार, इ. व्यावसायिक यांनी आपली दुकाने यात्रोत्सवात लावावीत, असे मोतीमाता मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सरीचंद पवार, उपाध्यक्ष गजानन पवार, सचिव गोविंद पवार, खजिनदार चरणदास पवार, सहसचिव संत्रीबाई पवार, सदस्य पारशीबाई पवार, हरी पवार, भगवान पवार, गणेश पवार, इ. पदाधिकार्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे आवाहन केले आहे.

Exit mobile version