Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मोठी बातमी : लवकरच राज्यात पेट्रोल-डिझलचे दर होणार कमी !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लवकरच इंधनावरील व्हॅट कमी करण्यात येणार असल्याची घोषणा केल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विश्‍वासदर्शक ठराव जिंकला. यानंतर याला उत्तर देतांना त्यांनी अनेक विषयांना स्पर्श केला. विशेष करून आपण शिवसेनेपासून वेगळे होण्याचा निर्णय का घेतला ? याबाबत त्यांनी भाष्य केले. यानंतर त्यांनी काही महत्वाच्या घोषणा केल्या. यात त्यांनी राज्य सरकार लवकरच इंधनावरील व्हॅट कमी करणार असल्याचे सांगितले. याबाबत लवकरच राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार असल्याचे ते म्हणाले. यामुळे राज्यात लवकरच पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलवर लावण्यात आलेला व्हॅट कमी करण्यात आल्यामुळे इंधन हे स्वस्त झाले आहे. आता राज्य सरकार देखील हाच निर्णय घेणार असल्यामुळे वाहनधारकांना दिलासा मिळणार आहे. विशेष करून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी हा निर्णय घेतल्याचा भाजप आणि शिंदे गटाला लाभ होण्याची शक्यता आहे.

Exit mobile version