Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मद्यधुंद तरूणाने केला सावत्र आईचा विनयभंग

crime

फैजपूर प्रतिनिधी । बामणोद येथील एका ३२ वर्षीय तरुणाने दारूच्या नशेत आपल्याच सावत्र आईचा विनयभंग केल्याची घटना रविवारी बामणोद गावात घडली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, येथून जवळ असलेल्या बामणोद गावातील किरण तायडे एका तरुणाने दारूच्या नशेत आपल्या सावत्र आई सोबत लज्जा वाटेल असे वर्तन करून विनयभंग केल्याची घटना रविवारी सकाळी घडली. विनयभंग केल्यानंतर आईला अश्लील शिवीगाळ करत जिवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी सावत्र आईच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलिस कॉन्स्टेबल विजय पाचपोळ करीत आहे.

Exit mobile version