Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शेंदुर्णीला रूग्ण संख्येची पन्नाशी पार; साखळी तोडण्यात अपयश

शेंदुर्णी, ता. जामनेर विलास पाटील । शेंदुर्णीला कोरोना बाधीतांची संख्या पन्नीशीच्या पार गेली असली तरी अजून येथील साखळी तुटण्यात अपयश आल्याचे दिसून येत आहे.

शेंदूर्णीला १३ जुलै पासून सक्तीचा लॉक डाउन पाळण्यात येत आहे. कृषी केंद्र, दूध डेअरी, मेडिकल स्टोअर्स यांनाही वेळेचे बंधन घालून अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यास संमती दिली गेली होती. त्यामुळे संबंधित व्यावसायिक पण दिलेल्या वेळेत व्यवसाय करून वेळेचे तंतोतंत पालन करीत आहेत. असे असतांनाच एकीकडे लॉक डाउनचे पालन केले जात असले तरी कोरोना संसर्ग साखळी तोडण्यात अपयश येत आहे. आजच्या घडीला शेंदूर्णी येथे कोरोना संसर्ग रुग्णांनी पन्नाशीच्या आकड्याला केले आहे. तर तीन रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनात संसर्ग साखळीचे भीतीने घर केले आहे.

सध्या पावसाळी वातावरण असून शेती मशागतीची कामेही जोमाने सुरू आहेत. त्यामुळे मजूर वर्गाला व शेतकर्‍यांना शेती कामांसाठी घराबाहेर पडावे लागत आहे. एकाच कुटुंबातील तीन-चार व्यक्तीचे करोना अहवाल पॉझिटिव्ह येत असल्याने समूह संसर्गाचा धोका वाढण्याची भीती येथिल नागरिकांच्या मनात घर करत आहे. नागरिकांनी भीती न बाळगता स्वतः व कुटुंबातील सदस्यांना कामाशिवाय घरा बाहेर पडू देऊ नये. तसेच विना मास्क फिरू नये,फिजीकल डिस्टन्स नियमांचे पालन करावे ज्यामुळे समूह संसर्ग रोखण्यासाठी मदत होईल असे आवाहन नगरपंचायत, पोलीस व प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे करण्यात आले आहे.

Exit mobile version