Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महाराष्ट्रात आतापर्यंत १० लाखांपेक्षा जास्त रुग्णांना डिस्चार्ज – आरोग्यमंत्री

मुंबई- महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये २३ हजार ६४४ करोना रुग्ण बरे होऊन घरी गेले असून  त्यामुळे राज्यात बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ही १० लाख १६ हजार ४५० इतकी झाली असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करुन दिली आहे.

महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये २३ हजार ६४४ करोना रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ही १० लाख १६ हजार ४५० इतकी झाली आहे. दरम्यान २० हजार ४१९ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. राज्यात सध्याच्या घडीला २ लाख ६९ हजार ११९ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. महाराष्ट्रातील करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ७६.९४ इतके झाले आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे.

मागील २४ तासांमध्ये ४३० मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यू दर हा २.६६ टक्के इतका झाला आहे. आजवर ६३ लाख ७६ हजार ६७६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १३ लाख २१ हजार १७६ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्याच्या घडीला राज्यात १९ लाख ४५ हजार ७५८ लोक होम क्वारंटाइन आहेत. तर ३० हजार ५७१ लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

Exit mobile version