Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रावेरात जि.प.सदस्याच्या विरोधात मोर्चा

रावेर प्रतिनिधी । रावेरा शहरात जिल्हा परिषद सदस्य नंदकिशोर महाजन यांच्या विरोधात विविध संघटनेतर्फे घोषणाबाजी करून मोर्चा काढण्यात आला. 

यावेळी मोठ्या प्रमाणात घोषणा देण्यात आल्या  निंभोरा- तांदलवाडी गटातील कामांची चौकशी करण्याचे निवेदन दिपाली कोतवाल यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आले.

रावेर तालुक्यातील दलितवस्ती योजनेच्या कामांच्या ई-निवेदा प्रक्रियेत नियमांची पायमल्ली झाली असून याची चौकशी करण्याची मागणी झेडपीच्या जनरल बैठकीत जिल्हा परिषद सदस्य नंदकिशोर महाजन यांनी केली होती.याचे पडसाद आज रावेरात बघायला मिळाला. या प्रकरणाला आता पूर्ण राजकीय वळण लागले असून आज विविध संघटना आक्रमक होऊन विविध संघटनांनी मोर्चा काढला यावेळी निंभोरा-तांदलवाडी गटातील सर्व कामांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली यावेळी जिल्हा परिषद सदस्य नंदकिशोर महाजन यांच्या विरुध्द तर गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल यांच्या समर्थनार्थ पंचायत समितीत घोषणा देण्यात आल्या.

यांचा होता मोर्चात सहभाग

बिएसपी जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप सपकाळे राजू खिरवडकर,ठेकेदार बाजिराव ठाकरे संतोष ढिवरे ईश्वर जाधव लोक संघर्षचे नुरा तडवी,इरफान तडवी गणेश बारेला राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष कुणाल महाले सामाजिक विभागाचे जिल्हाकार्यध्यक्ष पंकज वाघ चाँदखा तडवी शरीफ तडवी जमील तडवी कॉग्रेस अनुसूचित जाती तालुकाध्यक्ष सावन मेढे आदिवासी एकता परिषदचे प्रकाश भिल आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.

 

 

 

Exit mobile version