Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल येथील पत्रकार डी.बी.पाटील यांना ‘मूकनायक पुरस्कार’

यावल प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने आज पत्रकारांसाठी मोफत हेल्मेट वितरण आणि पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले असून यावल येथील पत्रकार दत्तात्रय पाटील यांना ‘मूकनायक पुरस्कार’ देण्यात आला आहे.

यावेळी जवळपास २२५ पत्रकारांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाकडून मोफत हेल्मेट वितरण करण्यात आले. दरम्यान, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ना. यशोमती ठाकूर उपस्थितीत होत्या. त्यांनी आपल्या भाषणात पत्रकार हा देशाची ताकत असून लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ आहे. लोकशाही मध्ये महत्वपूर्ण कार्य पत्रकारांचे असते. कोरोना काळातही पत्रकारांनी मोलाची भूमिका बजावली आहे. आपल्या सभोवताली घडणाऱ्या चांगल्या- वाईट गोष्टींची मांडणी ही पत्रकार योग्य पद्धतीने मांडत असतात. आणि मांडायला ही पाहिजे. असे त्या म्हणाल्या. पुरस्कारांमध्ये पत्रकारांना दोन जीवनगौरव पुरस्कार देण्यात आले   मूकनायक पुरस्कार यावलचे पत्रकार दत्तात्रय बाजीराव पाटील यांना देण्यात आले. 

इतरही विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विविध व्यक्तींना पुरस्कार देण्यात आले. पत्रकारांना पुरस्कार वितरण व पत्रकारांना मोफत  हेल्मेट वाटप यशोमती ठाकूर व आमदार शिरीष चौधरी व आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमास आ.शिरीष चौधरी, चंद्रकांत पाटील आमदार मुक्ताईनगर, विनायकराव देशमुख, अभय छाडेज, जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, युवा नेते धनंजय चौधरी, जि प सदस्य प्रभाकर आप्पा सोनवणे, जि प सदस्य सुरेखा पाटील, किशोर रायसाकडा खानदेश विभागीय अध्यक्ष, प्रदीप गायके ग्रामीण जिल्हाध्यक्ष पत्रकार संघ ,डिगंबर महाले उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष पत्रकार संघ हे होते. यावेळी प्रास्ताविक उत्तर महाराष्ट्र पत्रकार संघ अध्यक्ष प्रवीण सपकाळे यांनी केले.

सुत्रसंचालन प्रा.दिलीप सोनवणे यांनी तर आभार रावेर तालुक्याचे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ अध्यक्ष विलास ताठे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष विलास ताठे ,उपाध्यक्ष संतोष नवले ,कार्याध्यक्ष योगेश सैतवाल, सल्लागार सद्दाम पिंजारी, महेंद्र पाटील व सहकाऱ्यांनी  विशेष परिश्रम घेतले.

Exit mobile version