Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘राष्ट्रीय मुद्रीकरण पाईपलाइन’ योजनेला विरोध

जळगाव प्रतिनिधी |‘राष्ट्रीय मुद्रीकरण पाईपलाइन’ या योजनेला विरोध म्हणून जळगाव येथील बीएसएनएलचे कर्मचार्‍यांनी केले मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन केले.

बीएसएनएल कामगार युनियन (AIBDPA), सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची संघटना (BSNLEU)आणि कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स संघटना (BSNL CCWF) यांच्या समन्वय समितीद्वारे राष्ट्रीय मुद्रीकरण पाइपलाइन (national monetization pipeline) या योजनेला विरोध म्हणून ‘कोरोना’चे सर्व नियम पाळून या सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले.

यावेळी बोलतांना निलेश काळे यांनी, “कर्मचाऱ्यांना आणि सर्व सेवानिवृत्त सहकाऱ्यांना या योजनेची पुरेपूर माहिती मिळावी यासाठी दिल्ली येथील ‘CSPU’ यांच्या आदेशानुसार एकत्र आम्ही आलो असून या योजनेविषयी खरी माहिती मिळविण्याच्या उद्देश्याने मार्गदर्शनासाठी ‘CITU’चे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड नरेंद्र सिंग, जिल्हा सचिव कॉम्रेड विजय पवार, जिल्हा ट्रेसर हितेश शहा, सहसचिव प्रवीण चौधरी यांना बोलविले आहे असे सांगितले.

Exit mobile version