Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अश्लिल चाळे करत महिलेचा विनयभंग

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील अजिंठा चौफुली येथे राहणाऱ्या २८ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी गुरुवार ४ एप्रिल रोजी एकावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील एका भागात २८ वर्षीय महिला वास्तव्याला आहे. बुधवार ३ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता महिलाही कामाच्या निमित्ताने अजिंठा चौफुली येथे गेल्या होत्या. त्यावेळी संशयित आरोपी सुरेश तायडे रा. अजिंठा सोसायटी, जळगाव याने महिलेकडे बघून अश्लील हातवारे केले. तसेच महिलेचा हात पकडून अतिप्रसंग करत विनयभंग केला. दरम्यान महिलेने दुसऱ्या दिवशी गुरुवार ४ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी सुरेश तायडे यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार विजय पाटील हे करीत आहे.

Exit mobile version