Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दोन महिलांचा जातीवाचक शिवीगाळ करून विनयभंग; एकावर गुन्हा दाखल

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव येथे दोन महिला व पुरूषाला जातीवाचक शिवीगाळ करत दोन महिलांचा विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी गुरूवार १० ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या दोन महिला आणि पुरूष हे बुधवारी ९ ऑगस्ट रोजी सकाळी सव्वा नऊ वाजेच्या सुमारास धरणगाव तालुक्यातील शामखेडा शिवारातील शेतकरी बिपीन जगन्नाथ तिवारी रा. धरणगाव शेतात काम करत होत्या. त्यावेळी बिपीन तिवारी याने शेतात काम करणाऱ्या महिला आणि पुरूषांना जातीवाचक शिवीगाळ केली. त्यानंतर त्याने महिलांना अश्लिल शिवीगाळ करत त्यांचा विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर गुरूवार १० ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता महिलांनी धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून बिपीन तिवारी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपअधिक्षक सुनिल नांदवळकर करीत आहे.

Exit mobile version