Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लग्नाची मागणी करत अल्पवयीन मुलीचा विनयभंग; फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिच्यासोबतचे असलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत माझ्याशी लग्न कर नाहीतर आत्महत्या करून तुझी फसवणूक करेल” अशी धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या संदर्भात एका तरुणाविरोधात फैसपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील एका गावात १७ वर्षी अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान त्याच गावात राहणारा पवन राजू कोळी हा पीडित मुलीचा पाठलाग गेल्या १० महिन्यापासून करत आहे. माझ्याशी प्रेम संबंध ठेव, माझ्याशी लग्न कर नाहीतर तुझे वाढदिवसाचे सोबतचे फोटो व्हायरल करेल. तसेच तू माझ्याशी लग्न केलं नाही तर मी आत्महत्या करून तुझी फसवणूक करेल”, अशी फोनवरती धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर पीडित मुलीने नातेवाईकांसोबत फैजपूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी पवन कोळी यांच्या विरोधात फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोद्दीन सय्यद हे करीत आहे.

Exit mobile version