Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भावी महिला डॉक्टरचा विनयभंग; शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | छत्रपती शिवाजी नगर परिसरातील एका भागात राहणाऱ्या एका भावी महिला डॉक्टरचे मोबाईलमध्ये फोटो काढून रिक्षाचालकाने तिचा विनयभंग केल्याचा प्रकार शनिवारी २३ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता समोर आलाआहे.  या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बिहार राज्यातील २७ वर्षीय महिला ही जळगावात वैद्यकीय पदव्युत्तरचे शिक्षण घेत असून ती जळगाव शहरातील शिवाजी नगरातील एका भागात वास्तव्याला आहे.  गेल्या चार ते पाच महिन्यांपासून रईस (पुर्ण नाव माहित नाही) नामक रिक्षाचालक या महिलेशी जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न करीत वारंवार पाठलाग करीत होता. यामध्ये त्याने त्याच्या मोबाईलमध्ये महिलेचे फोटोही काढले व तिच्याशी गैरकृत्य करीत तिचा विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर महिलने शनिवारी २३ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.  त्यावरून रईसविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन अटक करण्यात आले आहे. पुढील तपास पोकॉ अश्विनी इंगळे करीत आहेत.

Exit mobile version