Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिंदी येथे महिलेचा विनयभंग; एकावर गुन्हा

भडगाव प्रतिनिधी । तालुक्यातील शिंदी शिवारात एका महिलेचा विनयभंग केल्याची घटना उघडकीला आली. याप्रकरणी एकावर भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील शिंदी येथील ४५ वर्षीय महिला आपल्या कुटुंबियांसह राहते. काल सोमवारी ९ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता शिंदी शिवारातील शेतात काम करत असतांना संशयित आरोपी संजय यशवंत पाटील  याने महिलेशी अंगलट करून विनयभंग केला. दुपारी ४ वाजता भडगाव पोलीसात संशयित आरोपीच्या विरोधात महिलेने तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून भडगाव पोलीसात विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढीलतपास पोहेकॉ पांडूरंग सोनवणे करीत आहे. 

Exit mobile version