Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग; एकावर गुन्हा दाखल

यावल प्रतिनिधी । शहरातील एका भागात राहणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना २ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता घडली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी , यावल शहरातील एका भागातील परिसरात १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह राहते. मुलगी गावातील साने गुरूजी विद्यालयात शिक्षण घेते. संशयित आरोपी संदीप धनराज सोनवणे रा. यावल हा गेल्या तीन ते चार महिन्यांपासून अल्पवयीन मुलाचा पाठलाग करत होता तर घराजवळ चकरा मारत होता. काल शनिवार २ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी घरात एकटी असतांना संशयित आरोपी संदीप सोनवणे घरात घुरून मुलीशी अंगलट केले. याप्रकरणी अल्पवयीन पिडीत मुलीच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात  रात्री ८ वाजता संशयित आरोपी संदीप सोनवणे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद खाडबहाले करीत आहे.

Exit mobile version