Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सांगवी येथील विवाहितेचा विनयभंग; यावल पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल

यावल लाइव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील सांगवी बुद्रुक येथील २० वर्षीय विवाहित महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मंगळवारी १५ मार्च रोजी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, “यावल तालुक्यातील सांगवी बुद्रुक येथील २० वर्षीय विवाहिता ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. मंगळवारी, १५ मार्च रोजी सकाळी ११ वाजता विवाहिता आपल्या नणंद सोबत गावातील हौदावर धुणे धुत असतांना गावातील जहांगिर तडवी रा. बोरखेड ता. यावल हा विवाहितेजवळ आला. विवाहितेला दम देवून तिचा मोबाईल नंबर घेतला. संशयित आरोपीने हौदापासून ते घरापर्यंत विवाहितेचा पाठलाग केला.

मोबाईलवर संपर्क करून अश्लिल वक्तव्य करून विवाहितेचा विनयभंग केला. दरम्यान विवाहितेने घडलेला प्रकार आपल्या पतीसह सासरच्या नातेवाईकांना सांगितला. याप्रकरणी मंगळवार, दि. १५ मार्च रोजी रात्री उशीरा विवाहितेच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी जहांगिर तडवी यांच्या विरोधात यावल पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार अशोक जवरे करीत आहे.

Exit mobile version