Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भोरस शिवारात विवाहितेचा विनयभंग; एकावर गुन्हा

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील भोरस शिवारात शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील भोरस येथील 23 वर्षीय विवाहिता आपल्या कुटुंबीयांसह राहते. ६ जुलै रोजी विवाहिता भोसर शिवारातील शेतकरी भाऊसाहेब महादू आगोणे यांच्या शेतात मजुरी करण्यासाठी आल्या होत्या. दरम्यान, संशयित आरोपी भाऊसाहेब आगोणे याने शेतात कोणी नसल्याचा फायदा घेत विवाहितेचा हात पकडून विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. या प्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी कैलास गावंडे करीत आहे.

 

Exit mobile version