Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गुणवंत मार्गदर्शक जिल्हा क्रीडा पुरस्काराने मोहम्मद खान सन्मानित

पाचोरा प्रतिनिधी । हॉकी असोसिएशन जळगाव आणि गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाने नुकताच राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला. यामध्ये 55 क्रीडा शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यात पाचोरा येथील अग्नो उर्दू हायस्कूलचे क्रीडा शिक्षक मोहम्मद अजहर खान फरीद खान यांना माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून गोदावरी फाउंडेशन चे सदस्य डॉ. केतकी पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. दिनेश पाटील, गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय पाटील उपस्थित होते. सहा क्रीडा शिक्षक / संघटक यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात आले. यासह ४९ शिक्षकांना “गुणवंत क्रीडा मार्गदर्शक” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आसिफ खान यांनी केले. तर उपस्थितांचे आभार प्रा. शाफिक अन्सारी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय व हॉकी असोसिएशन जळगाव यांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version