Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ममता बॅनर्जींनी घेतली मोदींची भेट; सीएए-एनआरसीवर केली चर्चा

modi 1

कोलकता वृत्तसंस्था । पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोलकाता येथील राजभवनात भेट घेतली आहे. सीएए, एनआरसी व एनपीआर या निर्णयावर चर्चा झाल्याची माहिती मिळाली असून या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

पश्चिम बंगाल सरकारकडून केंद्र सरकारने घेतलेल्या सीएए, एनआरसी व एनपीआरच्या निर्णयाचा तीव्र विरोध सुरू आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या भेटीवर प्रतिक्रिया देताना, मी पंतप्रधान मोदींना सीएए, एनआरसी व एनपीआरच्या विरोधात असल्याचे सांगितले आहे. तसेच, हा निर्णय मागे घ्यावा, असेही म्हटले असल्याचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत.

केंद्रातील सत्तारूढ भाजपाने सीएए, एनपीआर व एनआरसी लागू करण्याचा घेतलेल्या निर्णयास पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तीव्र विरोध केलेला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान मोदींच्या कोलकातात दौऱ्यानिमित्त या दोन्ही नेत्यांची भेट झाली आहे. राजभवनात या दोन्ही नेत्यांमध्ये साधारण २० मिनिट चर्चा झाली. या भेटीला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी औपचारिक भेट असल्याचेही म्हटले आहे. तर, चर्चेदरम्यान पंतप्रधानांना आपण सीएए, एनआरसी व एनपीआरच्या विरोध दर्शवला असल्याचेही त्यांनी सांगितले.

Exit mobile version