Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मोदींसोबत हे गोंडसबाळ कोण आहे ?

pm modi baby

नवी दिल्ली प्रतिनिधी । पंतप्रधान नरेंद्र मोदींना लहान मुलांशी असणाराजिव्हाळा हा जगजाहीर होत आहे. त्यांना जेव्हा आपल्या वेळापत्रकातून वेळ मिळतो, तेव्हा ते लहान मुलांच्यासोबत वेळ घालवत असतात. तसेच त्यांचे एका लहान मुलासोबतचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.

सर्वांना प्रश्न पडला असेल की, हे गोंडस बाळ कोणाचे आहे. व ते नरेंद्र मोदीजींच्या मांडीवर काय करत आहे. या फोटोत हा चिमुकला आनंदी दिसत असून समोरच्या टेबलवर असणारी चॉकलेट्स घेण्याचा प्रयत्न करत आहे. मोदींच्या ‘खास दोस्ता’ची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. फेसबुक, इन्स्टाग्रामवर या फोटोंना लाखो लोकांनी लाईक मिळत आहेत. तसेच  कमेंट्सचा पाऊस देखील पडत आहे. मोदींनी ‘खास दोस्त म्हटलेला हा चिमुकला भाजपाचे वरिष्ठ नेते तथा राज्यसभा खासदार सत्यनारायण जटिया यांचा नातू तो आहे.  यापूर्वी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लहान मुलांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले
आहेत.

Exit mobile version