Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मोदीजी…स्टुडंट की बात करो ! : काँग्रेसची मागणी

मुंबई, वृत्तसेवा । पंतप्रधान मोदी यांनी मनकी बात नव्हे तर स्टुडंट की बात करण्याची गरज असल्याचा खोचक सल्ला आज प्रदेश कांग्रेसतर्फे देण्यात आला आहे.

नीट व जेईई घेण्याबाबत अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाकडून आदेश देण्यात आले. यावर महाराष्ट्र काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना सवाल विचारण्यात आला आहे. नीट व जेईई परीक्षांबाबत विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी व्यक्त केलेल्या चिंता गंभीर आहेत. याची नोंद पंतप्रधान मोदींनी घ्यावी. मन की बात न करता स्टुडंट की बात करावी अशी टीका करण्यात आली आहे.

नीट व जेईई विद्यार्थ्यांच्या चिंता ऐकल्या पाहिजेत. त्यांचा विचार केला पाहिजे. आमच्या राज्यातील विद्यार्थ्यांची सुरक्षा महत्वाची असल्याने यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असा सवाल ही महाराष्ट्र काँग्रेसकडून विचारण्यात आला आहे.

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने आखलेल्या वेळापत्रकानुसार जेईईची परीक्षा १ ते ६ सप्टेंबर या कालावधीत होणार असून नीट परीक्षा १३ सप्टेंबर रोजी होणार आहे. एनटीएने दोन्ही परीक्षांचे ऍडमिट कार्ड जारी केले आहे. आतापर्यंत लाखो विद्यार्थ्यांनी हे अ‍ॅडमिट कार्ड डाउनलोड करून परीक्षेची तयारीदेखील सुरु केली आहे. या पार्श्‍वभूमीवर फेरविचार याचिकेवर सर्वोच्च न्यायालय कोणता निकाल देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version